स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा इतिहास समाजासमोर आणूया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा इतिहास समाजासमोर आणूया
स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा इतिहास समाजासमोर आणूया

स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा इतिहास समाजासमोर आणूया

sakal_logo
By

85938
.............

स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान समाजासमोर आणूया

कुलगुरू डॉ. शिर्के : शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागाची कार्यशाळा

कोल्हापूर, ता. २८ ः ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा इतिहास ‘अभिवादन स्वातंत्र्य सैनिकांना’ या उपक्रमातून समाजासमोर आणूया’, असे आवाहन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.
विद्यापीठातील इतिहास अधिविभागातर्फे आयोजित स्वातंत्र्य सैनिक कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. इतिहास विभाग आणि जनसंपर्क कक्षाने १५ ऑगस्ट २०२२ पासून ‘अभिवादन स्वातंत्र्य सैनिकांना’ हा उपक्रम सुरू केला. त्यामध्ये विद्यापीठाच्या शिव-वाणी या यूट्यूब चॅनेलवरून रोज एका स्वातंत्र्य सैनिकांची माहिती प्रसारित केली जाते. आतापर्यंत १९५ स्वातंत्र्यसैनिकांची माहिती प्रसारित झाली आहे. त्याअनुषंगाने नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. त्यात मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. निलांबरी जगताप, डॉ. भरतभूषण माळी (समन्वयक, स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश, सांगली), डॉ. अजित कुमार जाधव (समन्वयक, स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश, सातारा) आदी उपस्थित होते. इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनिश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले.