कोरोचीतील डॉ. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोचीतील डॉ. पाटील आयुर्वेदिक 
महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत
कोरोचीतील डॉ. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

कोरोचीतील डॉ. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

sakal_logo
By

86054
इचलकरंजी : डॉ. एस. पी. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळ्याचे दीपप्रज्वलन डॉ. पी. एस. पाटील, डॉ. एस. पी. पाटील, प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, अनिकेत कांबळे यांच्याहस्ते झाले.

कोरोचीतील डॉ. पाटील आयुर्वेदिक
महाविद्यालयात स्वागत समारंभ
इचलकरंजी : कोरोची (ता.हातकणंगले) येथील श्री भैरवनाथ शिक्षण समूहाच्या डॉ. एस. पी. पाटील आयुर्वेदिक महाविदयालयात बी.ए.एम.एस.च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात झाला. संस्थापक डॉ. प्रदिप पाटील, अध्यक्षा डॉ. शुभांगी पाटील, प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, व्यवस्थापक अनिकेत कांबळे, किशोर निकम यांच्या हस्ते धन्वंतरीचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. दिपक पाटील यांनी प्रास्ताविक केली. त्यांनी आयुर्वेदाचे महत्व विषद केले. यानंतर डॉ. संदेश आरेकर, डॉ. सोनिया कोळी, डॉ. रणजीत पाटील-दिंडे, डॉ. श्रध्दा कोळी व शिल्पा बाहेती, डॉ. रियाज मुजावर, डॉ. उमर मुजावर, डॉ. सानवी चौगुले, डॉ. अमित चौगुले यांनी आपला परिचाय विद्यार्थ्यांना करून दिला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थापक डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संजय पुरोहित व जयश्री कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. शिल्पा बाहेती यांच्या पसायदान गायनानंतर कार्यक्रमांची सांगता झाली.