तणावमुक्त रहा, दडपणाविना परीक्षा द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तणावमुक्त रहा, दडपणाविना परीक्षा द्या
तणावमुक्त रहा, दडपणाविना परीक्षा द्या

तणावमुक्त रहा, दडपणाविना परीक्षा द्या

sakal_logo
By

तणावमुक्त राहा, दडपणाविना परीक्षा द्या
---
समुपदेशकांचे विद्यार्थ्यांना आवाहन; दहावीचा आज पहिला पेपर
कोल्हापूर, ता. १ ः कोरोना कालावधीत इयत्ता आठवीत शिक्षण घेणारे विद्यार्थी उद्या (ता. २)पासून दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यांनी तणावमुक्त राहावे, दडपणाविना परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियुक्त केलेल्या समुपदेशकांनी केले आहे.
दहावीची परीक्षा म्हटले, की बहुतांश विद्यार्थ्यांवर काहीसा मानसिक तणाव, दडपण येते. त्याचा परिणाम पेपर देण्यावर होऊ शकतो. ते टाळण्यासाठी तणावमुक्त राहणे आवश्‍यक असते. ते लक्षात घेऊन दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांनी द्यावी, असा सल्ला समुपदेशकांनी दिला आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेची सुरुवात उद्या सकाळी अकराला मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्रावर सकाळी साडेदहापूर्वी पोचावे. प्रवेशपत्र, ओळखपत्र आवर्जून सोबत ठेवावे. परीक्षेबाबत मदतीची गरज लागल्यास शंका निरसनासाठी समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव डी. एस. पोवार यांनी केले.
...

कोणत्याही पेपरमधील ४० टक्के प्रश्‍न सोपे, ४० टक्के मध्यम, तर २० टक्के कठीण स्वरूपातील असतात. आपल्या नेहमीच्या शाळेत सहामाही, पूर्व आदी परीक्षांसारखीच वार्षिक परीक्षा असते. ही परीक्षा देताना केवळ ठिकाण बदलते. तणावमुक्त राहून एकाग्रता कायम ठेवून विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे.
- एकनाथ चौगले, समुपदेशक
...

कोरोनानंतर पहिल्यांदाच हे विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देत आहेत. त्यांनी शांतपणे आणि दडपणाविना परीक्षा द्यावी. पालक, कुटुंबीयांशी संवाद साधावा. पालकांनी मुलांना मोकळीक द्यावी. त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये.
- भारती पाटील, समुपदेशक
...

जिल्हानिहाय समुपदेशक असे ः
१) एकनाथ चौगले, कोल्हापूर (मोबाईल- ९५६१६३५६१०)
२) सुरेखा माने-कोकाटे, सांगली (९९२२३५३७५२)
३) भारती पाटील, सांगली (९५७९६८०१०८)
४)शांतीनाथ मल्लाडे, सातारा (९९२२२११५६४)
५) दीपक कर्पे, सातारा (९८२२३५२६२०)