अंगणवाडी सेविका फॉलोअप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविका फॉलोअप
अंगणवाडी सेविका फॉलोअप

अंगणवाडी सेविका फॉलोअप

sakal_logo
By

अंगणवाडी सेविकांना
मिळालेली वाढ अपुरी
---
जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे मत
कोल्हापूर, ता. १ ः अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासनाने जाहीर केलेली मानधनवाढ अपुरी असून, योग्य त्या मानधनासाठी यापुढेही आंदोलने करीत राहू, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आप्पा पाटील यांनी आज पत्रकाद्वारे दिली आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी भरीव मानधनवाढ, मराठीतून पोषण ट्रॅकर ॲप, नवीन मोबाईल, पेन्शन योजना, निवृत्त कर्मचारी यांना तत्काळ लाभ मिळावा, या व इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप केला. गेला आठवडाभर राज्यभर आंदोलने झाली. मंगळवारी (ता. २८) सेविकांनी आझाद मैदानावर धडक दिली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रताप लोढा, आयुक्त रूबल आगरवाल यांच्याबरोबर कृती समितीची बैठक झाली. यात सेविकांना एक हजार ५०० रुपये व मदतनीस यांना एक हजार रुपये वाढ देण्याचे जाहीर केले. तसेच, लवकरच पेन्शन देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. नव्या मोबाईलसाठी ११५ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले. मात्र, कृती समितीचे सदस्य जादा मानधनवाढीसाठी आक्रमक होते. ते शासनाने मान्य केले नाही. कृती समितीने संप मागे घेण्याचा निर्णय नाईलाजास्तव घेतला आहे. आंदोलनाला मिळालेले यश अंशतः आहे. पुढील काळात अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी तीव्र आंदोलनासाठी सज्ज राहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आप्पा पाटील व सरचिटणीस जयश्री पाटील यांनी केले आहे.