लाही पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाही पुस्तक प्रकाशन
लाही पुस्तक प्रकाशन

लाही पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

86447
कोल्हापूर : प्रा. डॉ. अनिल घस्ते लिखित ‘लाही’ कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना ताराराणी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील व मान्यवर.

लाही कविता संग्रहाचे प्रकाशन
कोल्हापूर, ता. २ : ताराराणी विद्यापीठातील कमला कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अनिल घस्ते यांच्या ‘लाही’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संस्थचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. डॉ. पाटील म्हणाले, ‘‘कवीने समाजातील दुख, दैन्य, दारिद्र्य यांवर आपल्या कवितांमधून भाष्य करावे. समाजातील विसंगती निर्भीडपणे मांडावी. मानवी नात्याने विविध भावसंबंध जपावेत. लाही हा काव्यसंग्रह समाजातील सर्व प्रश्नांना स्पर्श करणारा असा आहे.’’ मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुजय पाटील म्हणाले, ‘‘लाही काव्यसंग्रहातील कवितांच्या निर्मितीवर भाष्य केले. कवीची जडणघडण ज्या ग्रामीण भागातून आलेली आहे. त्या ग्रामीण समाज जीवनाचे ‘लाही’मधील कविता प्रातिनिधिक भाष्य करतात.’’ प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी ‘लाही’मधील कविता समाजातील आर्थिक विरोधाभास दाखविणारी कविता आहे, असे नमूद केले. प्रा. डॉ. नीता धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी, प्रा. वर्षा साठे उपस्थित होते.