
गोपालन बिग स्टोरी
लोगो- बिग स्टोरी
ओंकार धर्माधिकारी
गोपालनाचे व्यावसायिक
अन् ‘आरोग्यदायी मॉडेल’
-
जिल्ह्यात देशी गायींची वाढली संख्या; सेंद्रिय शेती, दुग्धोत्पादनातून ‘अर्थबळ’ही
कोल्हापूर : जिल्ह्यात देशी गायींची संख्या वाढत असल्याचे पशुगणनेच्या अहवालावरून दिसून आले आहे. देशी गाय आधारित सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन यामुळे गोपालन केले जात असून, देशी गायीच्या दुधालाही चांगली मागणी आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागांत देशी गायींचे व्यावसायिक तत्वावर गोपालन केलेले दिसून येते.
जिल्ह्यामध्ये शेतीचे प्रमाण अधिक आहे; मात्र बहुतांशी शेतांमध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातो. यामुळे जिल्ह्यातील जमीन नापीक होत आहे. तसेच कृषी उत्पादकांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. खतांचा वारेमाप वापर केल्याने आणि सतत किटकनाशके, खते वापरावी लागत असल्याने शेतीचा उत्पादन खर्चही वाढला आहे. या सर्व प्रश्नांवर सेंद्रिय शेती हे शाश्वत उत्तर आहे. देशी गायीच्या पंचगव्यापासून बनवलेली खते वापरून शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होतो. सेंद्रिय शेती केल्याने उत्पादन कमी होत असल्याचा गैरसमज आहे; मात्र सेंद्रिय पद्धतीने शेती करून उसासह अन्य पिकांचेही भरघोस उत्पादन घेतल्याचे यशस्वी प्रयोग जिल्ह्यात झाले आहेत. या शिवाय देशी गायीच्या दुधालाही मागणी असून, त्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. याच दुधाच्या तुपालाही मोठी मागणी आहे. एकूणच देशी गायीचे संगोपन केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. तसेच देशी गायीचे दूध, तूप आणि ताक हे आरोग्यालाही चांगले असल्याचे दिसले आहे.
देशी गायीच्या पंचगव्यापासून खते
पंचगव्यामध्ये गोमुत्र, शेण, तूप, दूध आणि दही यांचा समावेश असतो. यापासून घनजीवांमृत हे खत केले जाते. तसेच अमृतपाणी, पंचगव्य आणि गो-कृपांमृत ही द्रव खतेही बनवली जातात. ही खते मातीचा पोत सुधारतात. पिकांची वाढ चांगली होते. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ही खते घरच्या घरी करता येत असल्याने यासाठी फारसा खर्चही येत नाही. त्यामुळे ही खते शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.
-
देशी गायींच्या प्रजाती
खिल्लार, देवणी, डांगी, लालकंधारी, कोकणगिड्डा (या सर्व प्रजाती महाराष्ट्रातील आहेत). या शिवाय वेचूर, कांगायम, राठी, गिर, ओंगल, हल्लीकर, कांक्रेस, बारगूर, थारपारकर, साहिवाल या गायींच्या प्रजाती परराज्यातील आहेत; मात्र आता या प्रजाती जिल्ह्यातही पाळल्या जातात.
----
कोट
देशी गायीच्या पंचगव्यापासून बनवलेली खते वापरून सेंद्रिय शेती केल्याने जमिनीचा पोत सुधारतो. पिकांची वाढ चांगली होते. उत्पादन खर्चही कमी होतो. त्यामुळे देशी गाय सांभाळून शेती करणे लाभदायी आहे.
- प्रवीण पाटील, गोपालक शेतकरी.
--
कोट
देशी गायीच्या १ कप दुधामध्ये १४८ कॅलरीज असतात. म्हशीच्या तुलनेत हे कमी आहे. देशी गायीच्या दुधाचे फॅटही कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यास हे दूध उपयुक्त आहे. या दुधात व्हिटॅमिन ए, डी, बी आणि बी ट्वेल असते. या शिवाय झिंकचे प्रमाणही आहे. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यासाठी हे दूध चांगले. तसेच हाडांना बळकटी येण्यासाठी आणि मानसिक आजारांसाठीही देशी गायीचे दूध उपयुक्त असते. मधुमेहावरील उपचारांसाठीही देशी गायीचे दूध उपोयागत येते. त्वचारोगांवरही कच्चे दूध प्रभावी ठरते.
- डॉ. सूर्यकिरण वाघ.
---
जिल्ह्याचा नकाशा वापरणे
जिल्ह्यातील तालुकानिहाय गोवंश (देशी, क्रॉस दोन्ही)
तालुका संख्या
शाहूवाडी १८८८८
पन्हाळा ३५९८७
हातकणंगले ३४३७९
शिरोळ २९१६२
करवीर ५०३६६
गगनबावडा ३१०८
राधानगरी २१८७९
कागल ३५१०७
भुदरगड ११४८५
आजरा ६९८२
गडहिंग्लज १८८०९
चंदगड १९८५०.
------