आवश्यक संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक संक्षिप्त
आवश्यक संक्षिप्त

आवश्यक संक्षिप्त

sakal_logo
By

86751
राजाराम कारखाना नोकरांची पतसंस्था निवड
कोल्हापूर ः कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखरकारखाना नोकरांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विलास कचरे (वडणगे) यांची तर उपाध्यक्षपदी महादेव परीट (सावर्डे) यांची निवड झाली. माजी आमदार महादेवराव महाडिक, संचालक व माजी आमदार अमल महाडिक, कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी बिनविरोध झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यू. एस. उलपे यांनी काम पाहिले. कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, सचिव उदय मोरे, संस्था सचिव पी. व्ही. लोंढे आदी उपस्थित होते.
.............
86753
राजारामपुरी विकास मंचतर्फे घोडके यांचा सत्कार
कोल्हापूर ः कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच हृदयविकारावर मात करत राजारामपुरीतील संगीता घोडके यांनी एलएलबी परीक्षेत यश मिळवले. त्याबद्दल त्यांचा सत्कार राजारामपुरी विकास मंचतर्फे झाला. त्याबद्दल माजी नगरसेविका अलका जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. गोरगरिबांना कायद्याचे ज्ञान देण्यासाठी घोडके यांनी आपल्या प्रयत्न करावेत, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. माजी नगरसेवक शेखर घोटणे, विश्वास पांचाळ, बापू जाधव, नीता घोडके, छाया घोलपे, आनंदा वारके, आनंद गोंधळी, विलास नलवडे, रविराज पाटील, रमेश सरदेसाई, बाळासाहेब सूर्यवंशी, विजय निंबाळकर उपस्थित होते.