खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खून
खून

खून

sakal_logo
By

86739
विशाळगड : येथील दरीत येथे आढळून आलेले मृताचे कपडे.
कर्नाटकात खून करून
विशाळगड दरीत फेकले
सात महिन्यांनी छडा, अवशेष सापडले, सहा ताब्यात

रायबाग, ता. ३ : हारुगेरी (ता. रायबाग) येथील खून प्रकरणाचा धक्कादायक उलगडा आज झाला आहे. मृतदेहाचे अवशेष कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील दरीत सापडले आहेत. याप्रकरणी सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये खून झालेल्याच्या भावाचाही समावेश आहे. बाळासो बापू आजुरे (वय ५८, रा. हारुगेरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, हारुगेरी येथील आजुरे यांचे ऑगस्ट २०२२ मध्ये अपहरण केले होते. याप्रकरणात सहभागी असलेल्या टोळीवर अपहरण, खंडणी, खून असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. येथील एका बारजवळ अनेकांचे अपहरण केल्याचे प्रकार घडले आहेत. गेल्याच महिन्यात अशा टोळीला पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर असे गुन्हे उघड झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू ठेवला होता. पोलिसांनी तपास करून धक्कादायक उलगडा केला. पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडले असून, त्यातील एक संशयित मृताचा भाऊ आहे. अन्य एक जण अनेक गुन्ह्यांत सहभागी असल्याचे उघड झाले आहे. संशयित सापडल्यानंतर मृतदेह टाकलेल्या ठिकाणी पोलिसांनी विशाळगडावर भेट दिली. तिथे केवळ अवशेष सापडले आहेत.

कट रचून गुन्हे
संशयित कट करून गुन्हे करत होते. एका हॉटेलजवळ अपहरण करून खंडणी मागितली जात होती. त्यात यश न आल्यास शिरगुप्पी रोडवरील एका घरात खून करत असत. अपहरणासाठी वापरलेली मोटार घेऊन मृतदेह दूर फेकण्यासाठी वापरायचे. यातील एक संशयित अट्टल मारेकरी असून, तो जागा शोधून विशाळगडावर ठिकाण ठरवून दरीत फेकला होता.