
आमदार सतेज पाटील यांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार
87214
कोल्हापूर : विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल सतेज पाटील यांचा ॲड. गिरीश खडके यांच्या हस्ते झाला. या वेळी ॲड. इंद्रजित चव्हाण, ॲड. विजय ताटे-देशमुख, ॲड. नारायण भांदिगरे, ॲड. अभिजित भोसले उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील यांचा
बार असोसिएशनतर्फे सत्कार
कोल्हापूर : माजी गृहराज्य मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची कॉँग्रेस विधान परिषद गटनेतेपदी निवड झाली. याबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके व सचिव विजय ताटे-देशमुख यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी सतेज पाटील यांना सर्किट बेंच आंदोलनाची सद्यस्थिती सांगण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर सर्किट बेंच संदर्भात त्वरित बैठक घेणेचे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले. तसेच कॉंग्रेस विधान परिषद गटनेता म्हणून मी सर्वोतोपरी सर्किट बेंच मागणीचा पाठीशी आहे, असे सूतोवाच केले. या प्रसंगी ॲड. इंद्रजित चव्हाण, ॲड. नारायण भांदिगरे, ॲड. अभिजित भोसले उपस्थित होते.