राज्यस्तरीय काव्य करंडकाचे पाटील, कागणकर मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय काव्य करंडकाचे
पाटील, कागणकर मानकरी
राज्यस्तरीय काव्य करंडकाचे पाटील, कागणकर मानकरी

राज्यस्तरीय काव्य करंडकाचे पाटील, कागणकर मानकरी

sakal_logo
By

87312
गडहिंग्लज : राज्यस्तरीय काव्य करंडकाचे मानकरी पाटील व कागणकर यांचा किसनराव कुराडे यांनी गौरव केला. यावेळी डॉ. अनिल कुराडे, डॉ. एस. एम. कदम, प्रा. अशोक मोरमारे आदी उपस्थित होते.

राज्यस्तरीय काव्य करंडकाचे
पाटील, कागणकर मानकरी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : निमगाव येथील कर्मवीर भाऊराव हिरे महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय काव्य वाचन स्पर्धेत येथील शिवराज महाविद्यालयाच्या एम. ए. मराठीचे विद्यार्थी संकेत पाटील, रणजित कागणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून कर्मवीर काव्य करंडकाचे मानकरी ठरले.
या यशाबद्दल शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. संकेत पाटील यांनी ‘विद्रोह’, रणजित कागणकर यांनी ‘कवितेस कारण की..’ ही कविता सादर केली. या दोघांना माजी मंत्री प्रशांत हिरे, कवी विजय चोरमारे, संस्थेचे समन्वयक अपूर्व हिरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ९० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. संकेत व रणजित यांनी महाराष्ट्राच्या नामांकित स्पर्धेमध्ये आपल्या वक्तृत्वाची व काव्यवाचनाची छाप पाडली आहे. रत्नागिरीतील वक्तृत्व स्पर्धेतही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोगटे-जोगळेकर करंडक पटकाविला. महर्षी दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे प्रथम, अकोलातील छत्रपती करंडक स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला. विचार क्रांती २०२३ स्पर्धेत युवा वक्ता पुरस्कार पटकाविला. ‘फासाला ही कळले शेती जुगार आहे....’, जे सत्य, सुंदर, सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे....’ तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवीन शैक्षणिक धोरण, या विषयावर विविध स्पर्धेतून आपल्या वक्तृत्वाची मोहर उमटविली. या विद्यार्थ्यांनी दोन नामांकित करंडक, २० ट्रॉफी व ३५ हून अधिक स्पर्धेतून बक्षिसे पटकाविली आहेत. त्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन, तर मराठी विभाग प्रमुख डॉ. मनमोहन राजे, प्रा. अशोक मोरमारे यांचे मार्गदर्शन लाभले.