पारंपारीक पध्दतीने होळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपारीक पध्दतीने होळी
पारंपारीक पध्दतीने होळी

पारंपारीक पध्दतीने होळी

sakal_logo
By

पारंपरिक पद्घतीने होळी
विधीवत पूजा; जयसिंगपुरात बालचमूंसह आबालवृद्धांमध्ये उत्साह

जयसिंगपूर, ता. ७ः शहर आणि परिसरात सोमवारी (ता. ६) रात्री पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने होळी साजरी केली. होळीला नैवेद्य अर्पण करून नागरिकांनी होळीचे दर्शन घेतले. शहरात ठिकठिकाणी होळीचा जल्लोष पाहायला मिळाला.
शहरातील मटणाच्या दुकानांपुढे मंगळवारी ग्राहकांच्या रांगा लागल्या. होळी आणि धूलिवंदन शहरात उत्साहात साजरा केला. आठवडाभरापासून लहानांसह तरुणांनी होळीसाठी जवळच्या खेड्यातून शेणीचे संकलन केले होते. शहरातील सार्वजनिक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही होळी आणि त्यापाठोपाठ आलेल्या धूलिवंदनाची जय्यत तयारी केली होती. सोमवारी दुपारपासूनच होळीसाठी बालचमूंनी तयारी सुरू केली. रात्री सातपासून साडेनऊपर्यंत होळीकादहन केल्या जात होत्या. साऊंड सिस्टीमवर तरुणांनी नृत्य करत होळीचा आनंद साजरा केला. अनेक ठिकाणी सात-आठ फुटांपर्यंत गोवऱ्या रचल्या तर काही ठिकाणी केवळ ११ किंवा २१ गोवऱ्या रचून होळीची मनोभावे पूजा केली.
श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर विधीवत पूजन करून होलिकादहन केले. अनेक भाविकांनी होळीला नैवेद्य अर्पण केला. एका होळीतील अग्नीतून दुसरी अशा पद्धतीने होळीकादहन केली. मंगळवारी धूलिवंदनासाठी शहरातील मटणाच्या दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. होळी, धूलिवंदनानंतर शहरात आता रंगपंचमीचे वेध लागले आहेत.