तारदाळमधील नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारदाळमधील नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
तारदाळमधील नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

तारदाळमधील नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

sakal_logo
By

ich716.jpg
87520
तारदाळ ः ग्रामस्थांतर्फे शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून सहाय्यक पोलिस निरिक्षक अभिजीत पाटील यांना निवेदन दिले.
----------
तारदाळमधील नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
तारदाळ, ता. ८ ः येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ महिलांसह ग्रामस्थांनी शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी. या घटनेतील मुख्य सूत्रधारांना अटक करावी, अशा मागण्या केल्या. मागणीचे निवेदन सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांना दिले.
जिल्हा परिषद माजी सदस्य प्रसाद खोबरे, अंजना शिंदे, सरपंच पल्लवी पोवार, खोतवाडी सरपंच विशाल कुभार यांनी या हल्ल्याचा निषेध केला. रणजित पोवार, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, गजानन नलगे आदी उपस्‍थित होते.