
सम्राटनगर येथील जिव्हेश्वर सांस्कृतिक भवनचे उत्साहात उद्घाटन
87555
सम्राटनगर येथील जिव्हेश्वर
सांस्कृतिक भवनचे उद्घाटन
कोल्हापूर, ता. १२ ः सम्राटनगर येथील स्वकुळ साळी समाज संस्थेने नूतनीकरण केलेल्या श्री जिव्हेश्वर सांस्कृतिक भवनचे उद्घाटन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्य सभागृहाचे कै. सरस्वती तुकाराम दुधाने सभागृह असे नामकरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्वकुळ साळी समाज कोल्हापूरचे अध्यक्ष उदय दुधाणे होते.
आमदार जाधव म्हणाल्या, ‘‘मी राहत असलेल्या भागातच हे जिव्हेश्वर सभागृह नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीने समाजबांधवांनी उभे केले आहे. या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमातून एकीचा संदेश निश्चितपणे समाजात जाईल.’ उदय दुधाणे म्हणाले, ‘‘दहा हजार चौरस फूट जागेत अद्ययावत सुविधांसह सांस्कृतिक भवन साकारले आहे.’’ या कार्यक्रमात सांस्कृतिक भवनच्या बांधकामासाठीचे देणगीदार वसुंधरा शेंद्रे, विश्वनाथ शेंद्रे, तुकाराम दुधाणे, वसंतराव काजवे, शंकरराव दैव, अभय बिचकर, दीपाली दुर्गुळे, प्रशांत पांढरपट्टे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अशोक रोकडे, प्रकाश भंडारे, दिलीप घट्टे, सुरेश बडवे, बाळासाहेब पैठणकर, गणेश महाजन, आशा महाजन, विलास मुदगल, संतोष बेलेकर उपस्थित होते. वंदना दुधाणे, सुमन घट्टे, ज्योती दुधाणे, अनिता पागडे यांनी स्वागत केले. धोंडिराम पागडे यांनी प्रास्ताविक केले.