गडहिंग्लज परिसरात महिला दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरात महिला दिन उत्साहात
गडहिंग्लज परिसरात महिला दिन उत्साहात

गडहिंग्लज परिसरात महिला दिन उत्साहात

sakal_logo
By

87747
गडहिंग्लज : साधना प्रशालेत झालेल्या कार्यक्रमात एक कन्या मातांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी जे. बी. बारदेस्कर, जी. एस. शिंदे, रफिक पटेल आदी.

87748
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गजेंद्र बंदी, डॉ. मंगलकुमार पाटील, प्रा. अनिल उंदरे, डॉ. शिवानंद मस्ती आदी.

गडहिंग्लजला महिला दिन उत्साहात
एक कन्या मातांचा गौरव; स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : शहरासह तालुक्यात आज महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. साधना प्रशालेत एक कन्या मातांचा गौरव करण्यात आला. तर घाळी महाविद्यालयात नगरपालिकेकडील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. विद्यार्थिनींनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. कर्तुत्ववान महिलांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

साधना प्रशाला
येथील साधना प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कोतुमाय यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. महिला सबलीकरण या विषयावर शीतल भवारी व अ‍ॅबिगेल नोरेंज यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचे अनावरण झाले. एक कन्या असलेल्या माता पालकांना संचालिका फिलॉन बारदेस्कर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये भावना देसाई, भारती राजमाने, वैशाली पाटील, प्रतिभा यमगेकर यांचा समावेश आहे. स्त्री शक्तीचा जागर दाखवण्यासाठी संस्कृती सरदेसाई, सिद्धी कुराडे, सार्थकी कुराडे, परिपूर्णा हजारे यांनी कराटेचे धडे दिले. नेहा भागवणकर, तनिष्का शिवणे, श्रेया कोकीतकर, धनश्री पाटील यांनी लाठीकाठी, तलवार बाजी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर, प्राचार्य जी. एस. शिंदे, पर्यवेक्षक रफिक पटेल, स्मित पाटोळे, भारती राजमाने यांची भाषणे झाली. कविता कोळेकर यांनी स्वागत केले. निलोफर शेख, बरथा फर्नांडिस यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता नाईक यांनी आभार मानले. शीतल हरळीकर, अफसाना यळकुद्रे, मनीषा पाटोळे, वैशाली भिऊंगडे आदी उपस्थित होते.

शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी
येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कवयित्री निर्मला शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. राहुल जाधव अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्रा. अनघा पाटील, प्रा. गौरी पोवार यांचीही भाषणे झाली. विद्यार्थिनींनी कर्तुत्ववान महिलांच्या शौर्यगाथा हा कार्यक्रम सादर केला. प्रा. ऋतुजा सावेकर, प्रा. स्नेहल दळवी आदी उपस्थित होत्या. प्रा. स्नेहल दळवी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. वैष्णवी पाडले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पूजा पाटील यांनी आभार मानले.

आर. आर. अॅकॅडमी
येथील आर. आर. अॅकॅडमीत महिला पालक, शिक्षिका, महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. समन्वयक मंजिरी देशपांडे यांनी महिलांनी महिलांच्या सन्मानाची सुरुवात घरातूनच केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. अर्चना शेवाळे यांनी पालकांच्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संचालक प्रा. एच. रेड्डी यांनी महिला कुटुंबासाठी खूप कष्ट करतात. पुरुषांनीही त्यांच्या कामात मदत केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. श्रेया देसाई या विद्यार्थिनीचेही भाषण झाले. नाथा रेगडे यांनी आभार मानले.

गडहिंग्लज हायस्कूल
येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्राचार्य पंडित पाटील, पर्यवेक्षक सुनील कांबळे, मुख्याध्यापक विजय कांबळे यांच्या हस्ते उपस्थित महिलांचा सत्कार झाला. अनिता नाईक यांनी प्रास्ताविक केले. संगीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रेरणा कांबळे, साक्षी मांग, सौंदर्या गुंडप, संस्कृती आडावकर, मिनाक्षी ताशिलदार, मंगल श्रावस्ती, विश्रांती देसाई, पंडीत पाटील, सुनील कांबळे, मोहन कुंभार यांची भाषणे झाली. विश्रांती देसाई यांनी आभार मानले.

घाळी महाविद्यालय
येथील डॉ. घाळी महाविद्यालयात रेखा डवाळे, वंदना माने, शारदा सातपुते, अनिता वाघेला, अनुराधा सावरे, उज्ज्वला कोलते, दीपा वाघेला, अलका परमार, रुपाली म्हेत्री, स्नेहल म्हेत्री, रुपा सावरे या स्वच्छता कामगारांचा सत्कार करण्यात आला. प्रेरणा वाजंत्री हिने कविता सादर केली. पाकला व रांगोळी स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांचे भाषण झाले. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी, उपप्राचार्य अनिल उंदरे, डॉ. शिवानंद मस्ती, डॉ. सरला आरबोळे आदी उपस्थित होते. प्रा. राजश्री पोरे यांनी स्वागत केले. प्रा. वंदना खोराटे व प्रा. श्रद्धा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सरोज बिडकर यांनी आभार मानले.

ग्रामपंचात हेब्बाळ कसबा नूल
हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अंगणवाडी सेविका, शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश देवगोंडा, विकी मल्होत्रा, उपसरपंच सुरज गवळी, दुंडेश नवलगुंदी, देशपांडे, सुवर्णा कल्याणी, गीता सोलापुरे, आप्पासाहेब पाटील, द्राक्षायणी नवलगुंदे, गजानन पाटील, सचिन राऊत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

गडहिंग्लज नगरपरिषद
येथील नगरपरिषदेमार्फत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सकाळी शहरातून विद्यार्थिनी व युवतींची सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत १५० हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. रॅलीत सहभागींना कापडी बॅग व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तसेच महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान अंतर्गत पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी लेक वाचवा अभियान अंतर्गत ८७ मुलींना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या ठेव पावत्यांचे वितरण करण्यात आले. मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्‍वेता सुर्वे, अवंती पाटील, भारती पाटील यांच्यासह पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी नियोजन केले होते.