विश्व प्रबोधिनी गुरूकुल

विश्व प्रबोधिनी गुरूकुल

87809

आयुर्वेद तळागाळापर्यंत रूजला पाहिजे
राहुल रेखावार; श्री विश्व आयुर्वेद प्रबोधिनीचे उद् घाटन

कोल्हापूर, ता. ८ ः कोरोना काळात जगाला आयुर्वेदाचे महत्त्व समजले असून तो तळागाळापर्यंत पोचायला हवा. त्यासाठीच श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले. ट्रस्टतर्फे आयोजित श्री विश्व आयुर्वेद प्रबोधिनीच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. दरम्यान, पाच दिवसांच्या निवासी गुरूकुल उपक्रमात राज्यभरातून १८० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून सोळा वैद्य मार्गदर्शन करतील.
सर्व विद्यार्थी व वैद्यापर्यंत आयुर्वेदसंहिता पोचविणे, आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास गुरूंच्या सान्निध्यात राहून करणे व रुग्णांसाठी चिकित्सा करण्याकरिता प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम होतो. विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सेवाभावी आयुर्वेदिक शिबिरे घेणे, विविध औषधांशी निगडित संशोधने, बालकुपोषणाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी विविध आदिवासी भागात ‘मोदामृत’ औषधाचे वितरण आदी उपक्रम ट्रस्टतर्फे घेतले जातात. हे उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी श्री विश्व आयुर्वेद प्रबोधिनीची स्थापना झाली आहे. निवासी गुरूकुलमध्ये पहाटे योग साधना, दिवसभर साडेचार तासांचे दोन अभ्यास सत्रे होतात. असे निवासी गुरुकुल वर्षातून दोन वेळा घेतली जातील, असे ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांनी सांगितले. यावेळी श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर उपस्थित होते. राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या सामाजिक, सेवाभावी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. वैद्य प्रसाद पांडकर यांनी प्रास्ताविक केले. वैद्य विनय सचदेव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com