
गुरू-शिष्य प्रदर्शन रविवारपासून
87822
गुरू-शिष्य प्रदर्शन रविवारपासून
कोल्हापूर, ता. ८ ः रेखासम्राट टी. के. वडणगेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार (ता. १२) पासून चित्र-शिल्प प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उद्घाटनावेळी के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्कार प्रतीक्षा व्हनबट्टे यांना दिला जाईल. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कलादालनात प्रदर्शन भरेल. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, चित्रकार डॉ. मानसिंग टाकळे, प्राचार्य अजय दळवी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
रेखासम्राट टी. के. वडणगेकर यांचे चित्रकला आणि मूर्तीकलेतील योगदान अलौकिक आहे. कलामंदिर उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी अनेक कलाकार घडविले. त्यांच्या शिष्यांतर्फे २००१ पासून त्यांचा स्मृतिदिन होतो. प्रदर्शनात विजय टिपुगडे, प्रतीक्षा व्हनबट्टे, इंद्रजीत बंदसोडे, बबन माने, गजेंद्र वाघमारे, आरिफ तांबोळी, संतोष पोवार, किशोर राठोड, नागेश हंकारे, शैलेश राऊत, पूनम राऊत, मनोज दरेकर, अभिजीत कांबळे, मनीपद्म हर्षवर्धन, प्रवीण वाघमारे, विजय उपाध्ये, राहुल रेपे, विलास बकरे, शिवाजी मस्के, चेतन चौगुले आदींच्या कलाकृती मांडण्यात येतील. १८ मार्चपर्यंत सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठ वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.
............
87825
बंदिश मित्र परिवारातर्फे
रंगली तपस्या मैफल
कोल्हापूर, ता. ८ ः तबला विषयावर प्रेम करणाऱ्या, शिकणाऱ्या आणि शास्त्रीय संगीताची परंपरा जपण्यासाठी बंदिश मित्रपरिवारातर्फे देवल क्लबमध्ये प्रदीप कुलकर्णी यांची स्वतंत्र तबला वादनाची मैफल रंगली. त्यांना संदीप तावरे यांची नगमा साथ मिळाली. विविध घराण्यांचे कायदे, रेले, गती, चक्रधार, बंदिशी त्यांनी सादर केल्या. विविध संकल्पना घेऊन भविष्यात असे उपक्रम राबवण्याचा निर्धार केला. प्रसिद्ध गायक व संगीतकार शिवराज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. निशांत गोंधळी यांचे निवेदन तर रमेश सुतार यांचे ध्वनी संयोजन होते. विनायक लोहार, संदेश खेडेकर, कृष्णा माळवदे उपस्थित होते.