
शहाजी
शहाजी विधी महाविद्यालय
महाविद्यालय आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कायदे, हक्क आणि अधिकार जनजागृतीविषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा न्या. (प्रथम वर्ग) परवीन सय्यद यांनी विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण कायदे, घरगुती हिंसाचार संदर्भातील कायदे याविषयी मार्गदर्शन केले. न्या. विभा गायकवाड यांनी महिला हक्क व कर्तव्ये याबद्दल माहिती दिली. JMFC/ CJJD या परीक्षेमध्ये यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन नूतन न्यायाधीश झालेल्या महविद्यालयातील अमृता धो. जाधव, स्नेहा म. सकळे, प्रणोती श्री. वारके, करण कृ. जाधव, प्रगती धो. पाटील, तृप्ती द. इंगवले यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. प्रीतम पाटील, डॉ. अतुल जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. एम. सी. शेख यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. अस्मिता पाटील यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. अनिता लोहिया यांनी केल. आभार डॉ. सविता रासम यांनी मानले. प्राचार्य डॉ. प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सुहास पत्की यांनी संयोजन केले.