
मुकबधीरांना अन्नदानाने वाढदिवस
gad93.jpg
87855
गडहिंग्लज : साई मुकबधीर निवासी शाळेत वाढदिवसानिमित्त अन्नदान संजय गुंडप केले. रणजित बिरंजे, विपुल पाटील आदी उपस्थित होते.
------------------------
मुकबधीरांना अन्नदानाने वाढदिवस
गडहिंग्लज: येथील संजय गुंडप यांनी आपला वाढदिवस साई मुकबधीर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. फुटबॉल प्रशिक्षक अंजना तुरंबेकर, रणजित बिरंजे, विपुल पाटील, आप्पासाहेब पाटील, किरण पाटील, आशिष खोराटे, निखिल काटवळ, राजेंद्र गुंडप, श्रीकांत माळगे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सरिता रजपूत यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सुप्रिया निट्टूरकर यांनी प्रास्ताविक केले. छाया काळे यांनी आभार मानले.
------------------------------
gad94.jpg
87856
गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत डॉ. ज्योती व्हटकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर डॉ. संतोष जेठीथोर, डॉ. सुरेश चव्हाण उपस्थित होते.
ओंकार महाविद्यालयात कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात समकालिन ऐतिहासिक संदर्भ साधने निर्मिती व जतन या विषयावर कार्यशाळा झाली. संचालक उद्धव इंगवले यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. पहिल्या सत्रात डॉ. संतोष जेठीथोर यांनी मार्गदर्शन केले. इतिहास लेखन करीत असताना समकालिन साधनांना महत्वाचे स्थान असते असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात डॉ. ज्योती व्हटकर यांनी मार्गदर्शन केले. कागदपत्रांचे जतन करुन ठेवल्यामुळे इतिहासाचे लेखन करणे सुलभ झाले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचेही भाषण झाले.
---------------------------
गडहिंग्लज हायस्कूलमध्ये शिबीर
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये सामाजिक योजना शिबीर व माता-पालक सहविचार सभा झाली. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत यांच्याहस्ते उद्घाटन झाले. समाजकल्याणच्या तालुका समन्वयक सुरेखा डवर, वामन बिलावर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य पंडित पाटील अध्यक्षस्थानी होते. समाजकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींची माहिती श्रीमती डवर यांनी दिली. शशिकला पाटील, अंजना तुरंबेकर आदी उपस्थित होते. मोहन कुंभार यांनी आभार मानले.
----------
''रेडेकर''मध्ये आज आयुसीयूचे उद्घाटन
गडहिंग्लज : येथील केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयात नवीन आयुसीयू युनिट उभारले आहे. त्याचे उद्घाटन उद्या (ता.१०) दुपारी साडेतीनला होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. माजी नगरसेवक मच्छिंद्र कचरे अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अंजना रेडेकर यांनी केले आहे.