महिला स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष, ई-स्वच्छतागृहही बंद अवस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष, ई-स्वच्छतागृहही बंद अवस्थेत
महिला स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष, ई-स्वच्छतागृहही बंद अवस्थेत

महिला स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष, ई-स्वच्छतागृहही बंद अवस्थेत

sakal_logo
By

87908
कोल्हापूर : ‘आप’च्या महिला आघाडीने महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था दाखवून दिली.
महिला स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष,
ई-स्वच्छतागृहही बंद अवस्थेत
‘आप’च्या महिला आघाडीने दाखवून दिली वस्तुस्थिती
कोल्हापूर, ता. ९ : महिला स्वच्छतागृहांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याची वस्तुस्थिती आज ‘आप’च्या महिला आघाडीने दाखवून दिली. बिंदू चौक वाहनतळ येथील ई-स्वच्छतागृह बंद अवस्थेत तसेच इतर स्वच्छतागृहांची स्वच्छता नव्हती. दरम्यान, स्वच्छतेसाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा राबवावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.
महापालिकेने स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, लाईट-पाण्याची सोय करावी, बजेटमध्ये स्वच्छतागृहांसाठी दोन कोटींची तरतूद करावी या मागण्यांचे निवेदन उपायुक्त रविकांत आडसूळ यांना दिले होते. ८ मार्चपर्यंत सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी ‘आप’च्या महिला आघाडीने केली. त्या मागण्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने बिंदू चौक वाहनतळ येथील महिला स्वच्छतागृहांची परिस्थिती दाखवून दिली.
स्वच्छतागृह अस्वच्छ, वापरण्यास अयोग्य, लाईट व पाण्याचा अभाव असल्याचे दाखवून दिले. स्वच्छ व हायजेनिक स्वच्छतागृह बांधली जातील असा दावा महापालिका करताना अस्तित्वातील स्वच्छतागृहांची अवस्था किळसवाणी होती. या स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने यंत्रणा राबवावी अशी मागणी ‘आप’च्या महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील यांनी केली. या वेळी संघटक पल्लवी पाटील, डॉ. उषा पाटील, पूजा आडदांडे, पूनम ठाकरे, वंदना कांबळे, संजय साळोखे, अभिजित कांबळे, राकेश गायकवाड, विजय हेगडे, दुष्यंत माने, समीर लतिफ, सदाशिव कोकितकर, भाग्यवंत डाफळे, नजिल शेख आदी उपस्थित होते.