
कौलगेत स्वच्छ गल्ली स्पर्धा उत्साहात
gad99.jpg
87923
कौलगे : ग्रामपंचायत व नाळ फौंडेशनतर्फे झालेल्या स्वच्छ सुंदर गल्लीचे परीक्षण परिक्षकांनी केले.
----------------------------
कौलगेत स्वच्छ गल्ली स्पर्धा उत्साहात
गडहिंग्लज, ता. ९ : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत व नाळ फौंडेशनतर्फे स्वच्छ सुंदर गल्ली स्पर्धा झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील ११ गल्लींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रत्येक गल्लीत स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात आले होते. तसेच पताका लावल्या होत्या. रांगोळी काढलेली होती. विस्तार अधिकारी सुमेश जजलवार, ग्रामसेवक संदीप आदमापुरे, रेश्मा उबाळे, मंजिली चौगुले, पत्रकार दत्ता देशपांडे, पाणी व स्वच्छता कक्षाचे समूह समन्वयक अजित हेबुले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. देसाई गल्ली, मधली गल्ली, एसटी स्टँड परिसर, सोसायटी गल्ली, सुतार गल्ली या गल्ल्यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले. त्यांना अनुक्रमे ७०००, ५०००, ३०००, २०००, १००० रुपयांची बक्षिसे देण्यात आली. अन्य गल्ल्यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. यावेळी सरपंच भाऊसाहेब कांबळे, उपसरपंच संजय पोवार आदी उपस्थित होते.