बार असो. व्याख्यान  अँड संभाजी मोहिते

बार असो. व्याख्यान अँड संभाजी मोहिते

87967

राजर्षी शाहू महाराजांचे विचार अंगीकारावेत
ॲड. संभाजीराव मोहिते : जिल्हा बार असोसिएशनमध्ये व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : ''लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांचे चरित्र व विचार सर्वांनी अंगीकृत करणे हा आपल्या सर्वांचा ध्यास असायला हवा,'' असे ॲड. संभाजीराव मोहिते यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या औचित्याने संपूर्ण महाराष्ट्रात १० फेब्रुवारी ते १० एप्रिलपर्यंत ते १०० व्याख्याने देणार आहेत. त्यानिमित्त जिल्हा बार असोसिएशनमध्ये ''लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा आणि माणूस’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल प्रमुख पाहुण्या होत्या.
ॲड. मोहिते म्हणाले, ''राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात पडलेला दुष्काळ, प्लेगची साथ यावेळी दाखवलेली तत्परता व जनतेची घेतलेली काळजी हे त्यांचे काम राजा म्हणून आजही आदर्शवत आहे.’
बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांच्या हस्ते प्रमुख ॲड. मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी स्वागत केले. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. संदीप चौगुले, ॲड. तृप्ती नलवडे, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. प्रशांत चिटणीस, ॲड. अजित मोहिते, ॲड. रणजित गावडे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com