Tue, March 21, 2023

मनपाची मंगळवारी अंदाजपत्रकीय सभा
मनपाची मंगळवारी अंदाजपत्रकीय सभा
Published on : 10 March 2023, 3:40 am
मनपाची मंगळवारी
अंदाजपत्रकीय सभा
इचलकरंजी : येथील महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा १४ मार्चला दुपारी साडेबारा वाजता आयोजित केली आहे. महापालिका झाल्यानंतर ही पहिलीच सभा होत आहे. सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासकीय पातळीवर ही सभा होणार आहे. त्यामुळे सभेमध्ये कोणत्या महत्त्वाच्या तरतुदी असणार याबाबत उत्सुकता आहे. महापालिका झाल्यामुळे उत्पन्न वाढीवर प्रशासनाचा भर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन कराचा बोजा शहरवासीयांवर पडणार की कोणतेही करवाढ नसलेले अंदाजपत्रक असणार याची वाट पहावी लागणार आहे. साधारणपणे आतापर्यंत सुमारे ४०० कोटीच्या आसपास अंदाजपत्रक मांडले होते. पण आता नवनवीन अनेक योजना प्रस्तावित आहेत. त्यामुळे यंदाचे अंदाजपत्रक सर्वधिक जमा-खर्चाचे असण्याची शक्यता आहे.