२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२

sakal_logo
By

फोटो : 88442
कोल्हापूर : खाटिक समाज मंडळाच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने मटण मार्केटसमोर विजयी जल्लोष केला.
(नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)
...

खाटिक समाज निवडणुकीत
सत्तारूढ गटाची बाजी

विरोधकांचा धुव्वा : विजयी उमेदवार, समर्थकांचा जल्लोष

कोल्हापूर, ता. ११ : खाटिक समाज मंडळासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकत सत्तारूढ गटाने बाजी मारली. निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडाला. निकालानंतर विजयी उमेदवार आणि समर्थकांनी मटण मार्केटसमोर गुलालाची उधळण करत गाण्यांचा ठेका धरून आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, दुपारी वाढीव सभासद, बोगस मतदान आदी कारणांमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. सकाळपासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. संध्याकाळी सात वाजता निकाल घोषित झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय भोपळे यांनी काम पाहिले. सत्तारूढ गटाचे ‘शिट्टी’, तर विरोधी गटाचे ‘विमान’ हे चिन्ह होते.
खाटिक समाज विकास आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी - विजय कांबळे (७८८), धनाजी कोतमिरे (७४३), जयदीप घोटणे (७४२), किरण कोतमिरे (७३१), संजय जाधव (७३०), सोनल घोटणे (७२६), हेमंत भोपळे (७१८), शैलेंद्र घोटणे (७१७), शिवाजी घोटणे (७१५), राजू शेळके (६९५), महिला प्रतिनिधी सुनीता घोडके (७४५). पराभूत उमेदवार असे - शांताराम इंगवले (६४३), सुनील कांबळे (५७४), सुनील कोतमिरे (५६३), सागर गायकवाड (५६२), सचिन घोटणे (५६८), संजय घोडके (५९२), सचिन पलंगे (५६२), नरेंद्र प्रभावळकर (५९६), युवराज भोपळे (५६७), संजय मोरे (६२०), महिला प्रतिनिधी सुषमा कांबळे (६७४), अनिल मिरजे (६४).

बिनविरोध निवडून आलेले प्रतिनिधी : मुस्लिम सभासद प्रवर्ग- अब्दुलमज्जीद खाटिक, कय्यूम खाटिक. वैध मतदान १३५२, अवैध मतदान १४२, एकूण मतदान १४९४ झाले. महिला प्रतिनिधींमध्ये वैध मतदान १४१९, अवैध मतदान ७२, एकूण मतदान १४९१ झाले.