जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्‍प बुधवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्‍प बुधवारी
जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्‍प बुधवारी

जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्‍प बुधवारी

sakal_logo
By

लोगो
...

जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्‍प बुधवारी

वित्त विभागाकडून माहिती संकलन


कोल्‍हापूर, ता.११: सलग दुसऱ्या वर्षी जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्‍प प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. वित्त विभागाने अर्थसंकल्‍प तयार करण्यासाठी कंबर कसली असून, सर्व विभागांकडून अखर्चित र‍कमेची माहिती घेतली जात आहे. अर्थसंकल्‍पात यावर्षीच्या निधीचे अंतिम सुधारित व पुढील वर्षीचे मूळ अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.
दरवर्षी मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला जातो. जिल्‍हा परिषदेत सध्या प्रशासकराज सुरू आहे. गतवर्षी मार्च महिन्यातच प्रशासनाकडे जिल्‍हा परिषदेचा कारभार आला. या कारभाराला आजअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्‍प प्रशासनाकडूनच सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्‍प तयार करण्यासाठी सर्व विभागांच्या योजना, केलेली तरतूद, झालेला खर्च, उर्वरित रक्‍कम यासह अंतिम सुधारित तसेच पुढील वर्षीचे मूळ अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. जिल्‍हा परिषदेच्या विविध विभागांनी घेतलेल्या योजना विनाअडथळा पार पडल्या आहेत. ज्या योजना पूर्ण झालेल्या नाहीत, त्यांचा खर्च इतर योजनांवर केला जाणार आहे.
आगामी वर्षासाठी प्रशासनाकडून कोणत्या विभागाला व योजनांना झुकते माप दिले जाणार, हे पाहण्यासारखे आहे. जिल्‍हा परिषदेच्या आवारात बॅडमिंटन कोर्ट उभारण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या नावीन्यपूर्ण योजनेचा समावेश अंतिम सुधारित अर्थसंकल्पात समावेश होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चौथ्या मजल्याचे फर्निचर, इलेक्ट्रिक चार्जिंग स्‍टेशन आदी विषयांवरही निर्णय होणे अपेक्षित आहे.