पाच वर्षात ४ लाख जणांनी केला विमानप्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच वर्षात ४ लाख जणांनी केला विमानप्रवास
पाच वर्षात ४ लाख जणांनी केला विमानप्रवास

पाच वर्षात ४ लाख जणांनी केला विमानप्रवास

sakal_logo
By

विशेष
ओंकार धर्माधिकारी

विमान सफारी
पाच वर्षात ४ लाख ३८ हजार जणांनी केला विमानप्रवास
कोल्हापूर : विमानसेवा ही जिल्ह्याच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. पाच वर्षे आणि दोन महिन्यात सुमारे ४ लाख ३८ हजार २७७ जणांनी कोल्हापूर विमानतळावरून हवाई प्रवास केला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रवास कोल्हापूर ते हैदराबाद या विमानसेवेचा ५४३३० जणांनी लाभ घेतला आहे.
कोल्हापूरात विमानसेवेचा प्रारंभ छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात पहिल्यांदा झाला. मात्र त्यानंतर कायमस्वरुपी विमानसेवा सुरू होण्यास पाच दशकांचा कालावधी लोटला. मात्र आता विमानसेवेने गती पकडली आहे. उडाण योजनेनंतर काही नवीन विमानसेवा सुरू झाल्या. सध्या बेंगलोर, हैदराबाद, तिरुपती, अहमदाबाद येथे विमानसेवा सुरू असून याचा लाभ प्रवाशांना होत आहे. हैदराबाद आणि बेंगलोर येथे महिती व तंत्रज्ञान उद्योगाचा विकास झाला असून येथे कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील युवक, युवती मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. त्यांना कोल्हापूर विमानतळ सोयीचे झाले असून यामुळे त्यांच्या वेळेची बचत झाली आहे. लवकरच अन्य शहरांशी जोडणारी विमानसेवाही सुरू होणार आहे.
--------------------

वर्ष*प्रवासी*उडाण
२०१८ ते २०१९*१७,८४५*६५३
२०१९ ते २०२०*१३२०८१*३१११
२०२० ते २०२१*७४४७६*१९७४
२०२१ ते २०२२*१००१३८*२२९६
२०२२ ते २०२३*११३७३७*२४५२
एकूण*४३८२७७*१०४८६
-----------------------
१ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंतचे प्रवासी

विमानतळ प्रवासी
अहमदाबाद १३५१५
मुंबई ३४३०
बेंगलोर ४५०१
हैदराबाद ५४३३०
तिरुपती ३७१२७
--------------------------------------------------------------------------
कोल्हापूर विमानतळावरून विमानांचे उड्डाण आणि प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर आणखी प्रवासी वाढतील. नव्या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवाही सुरू होतील. विस्तारीकरणाचे कामही गतीने सुरू आहे.
- अनिल शिंदे (संचालक, कोल्हापूर विमानतळ)