इचलकरंजीतील रस्त्यासाठी 75 कोटी निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीतील रस्त्यासाठी 75 कोटी निधी मंजूर
इचलकरंजीतील रस्त्यासाठी 75 कोटी निधी मंजूर

इचलकरंजीतील रस्त्यासाठी 75 कोटी निधी मंजूर

sakal_logo
By

‘इचलकरंजी’तील रस्त्यासाठी
७५ कोटी निधी मंजूर
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासह परिसरातून जाणाऱ्या राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाच्या विविध कामांसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. शहर आणि परिसरातून अनेक राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग तसेच लगतच ग्रामीण मार्ग गेले आहेत. प्रदीर्घकाळापासून या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती व डागडुजी न झाल्याने सर्वच रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यांची सुधारणा करण्यासह आवश्यक त्याठिकाणी काँक्रिटीकरण, रुंदीकरण, मजबुतीकरण, आरसीसी गटर बांधकाम या कामांसाठी राज्य शासनाकडे आमदार आवाडे यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. या सर्वच कामांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले. या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.