
जैव वैद्यकीय कचर्याचे हवे गांभीर्य
लोगो
-
बिग स्टोरी
सदानंद पाटील
जैव वैद्यकीय कचऱ्याचे
हवे गांभीर्य
शास्त्रशुद्ध विल्हेवाट न लागल्यास आरोग्याला धोका
जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा दिवसेंदिवस अत्याधुनिक होत आहे. विविध आजारांवरील उपाचारासाठी विशेष रुग्णालयांची भरही पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांसह परिसरातील तसेच शेजारील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा लोंढाही कोल्हापुरकडे येताना दिसतो. आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे, तसेच छोट्या, मोठ्या दवाखान्यांची संख्याही वाढत आहे. या दवाखान्यातून निघणारा जैव वैद्यकीय कचरा ही एक नवीन समस्या निर्माण होवू पाहत आहे. ग्रामीण भागात, जंगल परिसरात अनेक ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा फेकून देण्याच्या घटना घडतात. त्याचे दुष्परिणाम निसर्गासह माणसाच्या आरोग्यावर व प्राणीमात्रावर होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळेच या जैव कचऱ्याबाबत प्रबोधन करुन त्याची योग्यतऱ्हेने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
कोविडच्या काळात धोका अधोरेखित
जिल्ह्यातील शासकीय, खासगी रुग्णालये, विशेष रुग्णालये ही जैव कचरा निर्मितीची केंद्रे आहेत. या दवाखान्यातून २ किलोंपासून ते अगदी ५०० आणि १ हजार किलोपर्यंत जैव वैद्यकीय कचरा निर्माण होतो. कोविडच्या काळात या कचऱ्याचे गांभीर्य अधोरेखित झाले. जर त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावली नाही तर, अनेक समस्या निर्माण होतात. रुग्णांना अशा साहित्यापासून संसर्ग होवू शकतो, हे ठळकपणे स्पष्ट झाले.
याचा होतो समावेश
जैव वैद्यकीय कचऱ्यात मानवी शारीरिक कचरा ज्यामध्ये मानवी ऊती, अवयव, शरीराचे अवयव यांचा समावेश होतो. तसेच प्राण्यांचा कचरा यामध्ये प्राण्यांच्या ऊती, अवयव, शरीराचे अवयव आणि प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांशी संबंधित काहीही भाग, त्याचबरोबर सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि प्रयोगशाळेतील कचरा, कालबाह्य/निरुपयोगी आणि सायटोटॉक्सिक औषधे, रक्त किंवा शरीरातील द्रवाने घाण केलेला कचरा, संसर्गजन्य घन कचरा, रासायनिक कचरा (सूक्ष्मजैविक प्रयोग, निर्जंतुकीकरण इ. मध्ये वापरलेली रसायने) आदीचा समावेश होतो. जवळपास १५ ते २० टक्के जैववैद्यकीय कचरा हा माणसाच्या आरोग्याला त्रासदायक असल्यानेच त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
........
जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या- ७६८
कॅन्सर, टीबी आदी विशेष रुग्णालये- ४२
जिल्ह्यातील दवाखान्यांची संख्या- १६८७
प्रसृतीगृहांची संख्या- २२४
खाटांची संख्या १२ हजार- १५४
...
चार्ट करणे
सरकारी दवाखान्यांची स्थिती
रुग्णालयांची संख्या २३
प्राथमिक आरोग्य केंद्र ८८
उपकेंद्रांची संख्या ४१३
डॉक्टर व वैद्यांची संख्या ५४९
परिचारिकांची संख्या १२१६
...
कोट
प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ततूपुर्वी आरोग्य संस्थांच्या स्तरावरच खड्डा काढून त्यात हा कचरा पुरला जात होता. मात्र आता मंडळाच्या सूचनेनंतर हा कचरा विशिष्ट तापमानात नष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात दोन संस्थांची निवड केली आहे. सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय कचरा या ठिकाणी नष्ट केला जात आहे.
-डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
कोट
जिल्ह्यात ५ हजारपेक्षा अधिक डॉक्टर्स, लॅब कार्यरत आहेत. यामधून दररोज १२०० किलो तर महिन्याला ३६ हजार किलो जैववैद्यकीय कचार तयार होतो. तो ८०० ते एक हजार डिग्री तापमानात नष्ट करावा लागतो. मात्र, जिल्ह्यातील ३५० पेक्षा अधिक डॉक्टर्स, दवाखाने यांचा कचरा अधिकृत प्रक्रिया संस्थेकडे येत नाही. चुकीच्या पध्दतीने प्रक्रिया केल्याने त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
-किशोर पवार, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ