
भाकप निदर्शने
जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर
भाकपची निदर्शने
कोल्हापूर , ता. १४ ः देशभरातील दलितांवरील अत्याचाराच्या घटना रोखा, अत्याचार करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करा अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व दलित अधिकार आंदोलनने दिला.
भाकपचे जिल्हा सचिव सतिश्चंद्र कांबळे म्हणाले, देशातील १२२ विद्यार्थ्यांनी जातीय अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते अशा अत्याचार करणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी.’’
भाकपचे ज्येष्ठ नेते दिलीप पोवार, शहर सचिव रघुनाथ कांबळे यांची भाषणे झाली. बी. एल. बर्गे, सुमन पाटील, दिलावर मुजावर, फारूक मुल्ला, हिदायत मुजावर, मुस्ताक शेख, सादिक मुल्ला, रितेश दुताळे, इम्तियाज हकीम, जुबेर पठाण, राजू मुल्ला, इर्शाद फरास आदीनी या आंदोलनात भाग घेतला.