आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांची निदर्शने
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांची निदर्शने

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांची निदर्शने

sakal_logo
By

89236
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयासमोर परिचारिका एकत्रित येत आंदोलनास पाठिंबा दर्शिवला. (पद्माकर खुरपे : सकाळ छायाचित्रसेवा)


आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही
कर्मचाऱ्यांची निदर्शने
इचलकरंजी, ता. १५ : राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशी ही इचलकरंजी शहरातील शिक्षक संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयावर एकत्रित येत निदर्शने केली. या वेळी पेन्शन आमच्या हक्काची यांसह अन्य घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान, आयजीएम रुग्णालयातील अधिपरिचारिका संघटनेने ही रुग्णालयाच्या बाहेर निदर्शने करून कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
मागण्याबाबत सरकार जलद निर्णय घ्यावे यासाठी मंगळवारी इचलकरंजी शहरातील शिक्षक संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढून निदर्शने केली होती. या वेळी मागण्याचे निवेदन शिरेस्तेदर संजय काटकर यांच्याकडे देण्यात होते. निवेदनात राज्य सरकारी निम्न सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त एन. पी. एस ही नवीन पेन्शन योजना रद्द करावी व जुनी पेन्शन योजना (महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२ व १९८४) पुन्हा पूर्ववत लागू करावी, असे नमूद करण्यात आले होते. शिक्षक संघटनेकडून दुसऱ्या दिवशी प्रांत कार्यालयावर एकत्रित येत निदर्शने करण्यात आली. शहरात ही महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवल्याने शासनाचा लाखो रूपाचा महसूल बुडाला आहे.