प्लास्टिक बंदीबाबत तडजोड नाही; मुख्याधिकारी खारगे

प्लास्टिक बंदीबाबत तडजोड नाही; मुख्याधिकारी खारगे

gad15.jpg
गडहिंग्लज : प्लास्टिक बंदी कार्यवाहीबाबत व्यापाऱ्यांना माहिती देताना स्वरुप खारगे. शेजारी प्रा. अनिल मगर, अनिल गंदमवाड, रवी जाधव, प्रशांत शिवणे उपस्थित होते.

प्लास्टिक बंदीबाबत तडजोड नाही
मुख्याधिकारी खारगे; गडहिंग्लजला व्यावसायिकांसह बैठक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : महाराष्ट्र शासनाच्या २०१८ मधील प्लास्‍टिक बंदी आदेशाची कार्यवाही करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे. पैसे वसुलीसाठी नव्हे तर शहर प्लास्टिक मुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून पालिका प्रशासनाकडून कारवाईची मोहीम सुरू आहे. या कार्यवाहीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यामुळे व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करावा, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केले.
प्लास्टिक बंदी मोहिमेतंर्गत पालिकेने कडक धोरण राबविले आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईमुळे अन्याय होत असल्याची भावना व्यापाऱ्यांत आहे. त्यासंदर्भात आज शाहू सभागृहात व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यात खारगे यांनी कोणते प्लास्टिक वापराला परवानगी आहे आणि कोणत्याला नाही याची स्लाईड शोद्वारे माहिती दिली.
खारगे म्हणाले, ‘‘५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक न वापरण्याच्या स्पष्ट सूचना शासनाच्या आहेत. काय वापरावे आणि काय नाही हेसुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे. त्याची जनजागृती पालिकेकडून वारंवार सुरू आहे. घंटागाडीवरुन पुकारले जाते. काही प्लास्टिकवर ५१ मायक्रॉनचा शिक्का असतो. परंतु, व्यापाऱ्यांनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून त्याची खातरजमा करावी. ५० मायक्रॉनपेक्षा पुढील प्लास्टिक पिशवीचे वजन दोन ग्रॅम भरलेच पाहिजे. कोणतेही प्लास्टिक ५० मायक्रॉनच्या वरील असल्याचे सांगत गळ्यात मारले जाते. यामुळे व्यापाऱ्यांनी सावधानता बाळगावी. बंदीचे पाचवे वर्ष सुरू असूनही अजून प्लास्टिकचा वापर थांबलेला नाही. यामुळे कारवाई सुरू आहे. वसूलीसाठी पालिका ही मोहीम राबवित नाही, तर शहर स्वच्छ सुंदर बनवण्याचे ध्येय आहे. त्यात कोणतीही तडजोड करणार नाही. माझी वसुंधरा अभियानातून पालिकेला बक्षिसे मिळत आहेत. त्याचा शहरालाच फायदा आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी प्लास्टिक वापर बंद करावा.
प्रा. अनिल मगर, जल अभियंता अनिल गंदमवाड, प्लास्टिक विरोधी पथकाचे प्रमुख रवी जाधव, प्रशांत शिवणे आदी उपस्थित होते. व्यापारी संघटनेचे राजेश बोरगावे यांच्यासह रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, नागेश चौगुले, चंद्रकांत मेवेकरी आदींनी सूचना मांडल्या.
---------------
चौकट...
मुदत देण्याची मागणी
यावेळी काही व्यापारी व प्रतिनिधींनी प्लास्टिकचे काही नमुने दाखवण्यासाठी सभागृहात आणून आपापल्या शंकांचे निरसन करुन घेतले. व्यापाऱ्यांना आपल्याकडील प्लास्टिकच्या विल्हेवाटीसाठी १५ दिवसांची मुदत द्या. त्यानंतर एक एप्रिलपासून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com