आजरा ः पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त

आजरा ः पोलीस वृत्त

sakal_logo
By

आजऱ्यात जुगार अड्ड्यावर
छाप्यात ४२०० रुपये जप्त
आजरा, ता. १५ ः आजरा बसस्थानकासमोर उघड्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ४२०० रुपये रोख व मुद्देमाल जप्त केला. गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कारवाई केली. आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या व रोख ४२०० रुपये जप्त करण्यात आले. नामदेव मुळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद पोलिस हवालदार प्रकाश पुजारी यांनी दिली आहे.
००००