मुंबई, पुणे, परभणी, जळगाव संघ विजयी

मुंबई, पुणे, परभणी, जळगाव संघ विजयी

लोगो- आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक स्पर्धा
-
मुंबई, पुणे, परभणी, जळगाव संघ विजयी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्यात आज तिसऱ्या दिवशी मुंबई, पुणे, परभणी आणि जळगाव या विद्यापीठांच्या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजय मिळविला.
सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई विद्यापीठाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठावर तब्बल १३२ धावांनी मात केली. फलंदाजी करताना मुंबई विद्यापीठाने २० षटकांत १ बाद २०० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सोलापूरचा संघ १२.१ षटकात सर्व बाद ६८ धावाच करू शकला. मुंबई विद्यापीठाचे अनिल घडसी सामनावीर ठरले. दुसऱ्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर ११ धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना पुणे विद्यापीठाने २० षटकांत २ बाद १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नांदेडचा संघ १९ षटकांत सर्व बाद १४६ धावापर्यंतच पोहोचू शकला. मनीष गायकवाड सामनावीर ठरले. दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चार गडी राखून बाजी मारली. नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १ बाद १३९ धावा केल्या. या धावांचे आव्हान जळगांव संघाने १७.१ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. जितेंद्र पाटील सामनावीर ठरले. दुसऱ्या सामन्यात परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठावर ७ गडी राखून विजय मिळविला. नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि १९.५ षटकांत सर्व बाद ९८ धावा केल्या. परभणी संघाने हे आव्हान अवघ्या १२.१ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. धीरज पाथ्रीकर सामनावीर ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com