लपलेल्या नायकांचा अभ्यास करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लपलेल्या नायकांचा अभ्यास करा
लपलेल्या नायकांचा अभ्यास करा

लपलेल्या नायकांचा अभ्यास करा

sakal_logo
By

gad162.jpg
89424
गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. उमेश कदम यांनी मार्गदर्शन केल. या वेळी डॉ. सुरेश चव्हाण, राजन पेडणेकर, भगवानगिरी महाराज आदी उपस्थित होते.
---------------------------
लपलेल्या नायकांचा अभ्यास करा
डॉ. उमेश कदम; ओंकार महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील केवळ मुख्य नायक आपल्याला माहीत आहेत. पण, देशातील गावागावांत ज्ञात-अज्ञात इतिहासाचे नायक लपलेले आहेत. त्यांच्या अभ्यास करा. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला विशिष्ट कालखंडात कैद करू नका, असे मत भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे सचिव व इतिहास अभ्यासक डॉ. उमेश कदम यांनी व्यक्त केले.
येथील ओंकार महाविद्यालयात स्वातंत्र्य चळवळीतील गडहिंग्लज परिसरातील ज्ञात-अज्ञात नायक या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले. या वेळी डॉ. कदम बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर अध्यक्षस्थानी होते. नूलच्या रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्‍घाटन झाले.
डॉ. कदम म्हणाले, ‘‘मध्ययुगीन भारताचा इतिहास हा केवळ मुघलांचा नाही. आपण कितीवेळा हरलो हे शिकवण्यापेक्षा आपण किती वेळा उभा राहिलो हेही शिकवा. कारण सोमनाथ मंदिर सोळा वेळा पाडणारे होते तसे सोळा वेळा बांधणारेसुद्धा होते. हे मुलांना शिकवले पाहिजे.’’ भगवानगिरी महाराज म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव ठेवा. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील क्रांती ही शस्त्राविना केली गेली. म्हणूनच भारतीय क्रांती ही अत्यंत वेगळी आहे.’’
क्रांतिपर्व या भित्तीपत्रकाचे अनावरण झाले. दूर्गवीर प्रतिष्ठानच्या सहकार्याने गडकिल्ल्यांची माहिती व संवर्धानावर अधारित चित्र प्रदर्शन भरवले होते. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. डॉ. काशिनाथ तनंगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. संजीवनी पाटील व डॉ. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात डॉ. चंद्रवदन नाईक आणि डॉ. निलांबरी जगताप यांनी मांडणी केली. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. ऋतुजा पेडणेकर- बांदिवडेकर यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप झाला. राधिका पेडणेकर, डॉ. वृषाली पेडणेकर, डॉ. प्रवीण शर्मा, डॉ. संभाजी मोरे, प्रा. धर्मवीर क्षीरसागर, प्रा. भीमराव शिंदे, प्रा. प्रशांत कांबळे, मुख्य लिपिक प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.