इचलकरंजी मनपा पूर्वपदावर

इचलकरंजी मनपा पूर्वपदावर

ich१६७.jpg
89508
इचलकरंजी ः सफाई कर्मचारी दोन दिवस संपात उतरल्यामुळे शहरात अशा प्रकारे ठिकठिकाणी कचरा साचला होता.
------------------------
इचलकरंजी मनपा पूर्वपदावर
सफाई कर्मचारी रुजू; १२ ते ६ या कालावधीत केली स्वच्छता

इचलकरंजी, ता. १६ ः संपामुळे गेली दोन दिवस ठप्प असलेले महापालिकेचे कामकाज आज पूर्वपदावर आले. सर्व कर्मचारी आज कामावर रुजू झाले. त्यामुळे प्रशासकीय कार्यालयात आज दिवसभर नागरिकांची वर्दळ वाढली. दुपारी १२ ते सायंकाळी ६ यावेळेत शहरात स्वच्छता केली. उद्यापासून (ता. १७) नियमित सकाळच्या सत्रात स्वच्छता केली जाणार आहे.
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी महापालिकेचे कर्मचारी संपात उतरले होते. फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सफाई कर्मचारीही संपात सहभागी झाले होते. त्यामुळे दोन दिवस शहरातील अंतर्गत स्वच्छता ठप्प झाली होती. घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील कचरा उठावाचे काम १०० टक्के सुरू होते. तर परीविक्षाधीन कालावधीत कार्यरत असलेल्या ३२ कर्मचाऱ्यांकडून मुख्य रस्ते आणि आठवडी बाजार येथे स्वच्छता केली. याशिवाय पाच वार्डात खासगी मक्तेदाराच्या माध्यमातून स्वच्छता केली.
संप लांबल्यास शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची भीती होती. त्यादृष्टीने प्रशासनाने तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी सफाई कर्मचारी नियुक्तीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. याशिवाय स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, सुदैवाने संपातून बाहेर पडत काळ्याफिती लावून कामकाज करण्याचा निर्णय महापालिका कर्मचाऱ्यांच्या राज्यपातळीवरील कर्मचारी संघटनेने घेतला. त्यानुसार आज सकाळी कर्मचाऱ्यांची सभा झाली. त्यामुळे आजपासून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रशासकीय कामकाजास सुरुवात झाली. सफाई कर्मचाऱ्यांनी आज एक दिवस दुपारी १२ ते सायंकाळी ६ यावेळेत शहरातील अंतर्गत स्वच्छता केल्याने दोन दिवस पडलेला कचरा दूर झाला.
----------
संभाव्य कारवाई टळली
दोन दिवस प्रशासकीय कामकाज ठप्प होते. फक्त अधिकारी उपस्थित होते. मात्र, लिपीक वर्ग संपात होता. जुनी पेन्शन लागू असतानाही अनेकजण संपात उतरले होते. ही बाब आयुक्तांनी गांभीर्याने घेतली होती. तातडीने रुजू न झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला होता. तत्पूर्वीच, संपातून माघार घेतल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवरील संभाव्य कारवाई टळली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com