आरोग्यच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष
आरोग्यच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष

आरोग्यच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ...लोगो
...

‘आरोग्य’ च्या दैनंदिन कामकाजावर लक्ष

कुटुंब नियोजन शस्‍त्रक्रिया संपाने प्रभावित

कोल्‍हापूर, ता.१६: जुनी पेन्‍शन लागू करावी, यासाठी पुकारण्यात आलेल्या संपाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. शासकीय कामकाज ठप्‍प होत आहे. तरीही सर्वाधिक लक्ष आरोग्य विभागावर केंद्रित करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवा विस्‍कळित होणार नाही, यासाठी शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे येणाऱ्या‍ सर्व रुग्‍णांवर उपचार करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. सध्या सर्वच आरोग्य संस्‍थांत डॉक्‍टर कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीला आता उपकेंद्रांचे कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र संपामुळे कुटुंब नियोजन शस्‍त्रक्रियेचे काम मात्र प्रभावित झाले आहे. संप मागे घेतल्यानंतर या शस्‍त्रक्रिया केल्या जाणार असल्याचे जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी सांगितले.

जिल्‍ह्यात ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४१३ उपकेंद्रे आहेत. या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने रुग्‍ण उपचारासाठी येतात. जिल्‍ह्याच्या दुर्गम भागात तर शासकीय आरोग्य सेवेशिवाय दुसरा पर्याय उपलब्‍ध नाही. त्यामुळे शासन स्‍तरावरुनही सातत्याने आरोग्य सेवेचा आढावा घेतला जात आहे. सध्या तरी संपामुळे रुग्‍णसेवेवर फारसा प्रभाव पडलेला नाही. वैद्यकीय अधिकारी सेवेत असल्याने नियमित रुग्‍णांवर उपचार सुरु आहेत. मात्र रुग्‍णांना सहाय्‍य करणारे कर्मचारी संपावर असल्याने डॉक्‍टरांच्या मदतीला कर्मचारी उपलब्‍ध नाहीत. त्यामुळे उपकेंद्रांचे कर्मचारी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मदतीला पाठवण्यात आले आहेत.

सध्या तरी आरोग्य सेवेत संपाचा फारसा आडथळा आलेला नाही. मात्र कुटुंब नियोजन शस्‍त्रक्रिया व नवीन विषाणूच्या रुग्‍णांचा शोध घेण्याचे काम मात्र ठप्‍प झाले आहे. राजपत्रित अधिकारी संपावर जाण्यापूर्वी हा संप मिटणे आवश्यक आहे. मात्र तसे झाले नाहीतर मात्र आरोग्य विभागालाही अडचणी येवू शकतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.