हद्दपार गुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दपार गुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल
हद्दपार गुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल

हद्दपार गुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

फोटो
...

हद्दपार गुन्हेगाराकडून खंडणीची मागणी

चौघांविरोधात गुन्हा दाखल ः बोंद्रेनगर, बालिंगा पाडळी परिसरातील घटना

कोल्हापूर, ता. १८ ः जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने काल रात्री बोंद्रेनगर परिसरातील बालिंगा पाडळी येथे खंडणी मागून दहशत निर्माण केली. याबाबत फिर्याद दाखल झाल्यावर पोलिसांनी संशयित आरोपी हद्दपार असलेल्या उमेश कोळापटे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. उमेश कोळपाटेसह, तानाजी कोळापटे (रा.बालिंगा पाडळी), अंगात चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेला वीस ते बावीस वर्षाचा तरुण आणि मरुन रंगाचा शर्ट घातलेला आणखी एक तरुण अशा चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. याची फिर्याद ज्ञानदेव कबु घुरखे यांनी दिल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी घुरखे आणि संशयित आरोपी उमेश कोळापटे आणि तानाजी कोळापटे हे एकमेकांच्या घरासमोर राहण्यास आहेत. फिर्यादी घुरखे हा मजुरीचे काम करतो. यातील संशयित आरोपी उमेशवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जिल्ह्यातून हद्दपार आहे. उमेशला जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोबत अनोळखी दोघे घेवून तो फिर्यादीच्या घरासमोर फिरत होता. फिर्यादी घुरखे यांच्या घरात घुसून काल रात्री उमेश याने त्यांना श्रीमुखात लगावली. तसेच दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर तुला सोडणार नाही, असे म्हणून मारहाण केली. तसेच घराचा दरवाजा मोडला. घरातील प्रापंचिक साहित्यही विस्कटले. तसेच सोबत असलेल्यांनीही लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपी तानाजी याने तलवार फिरवत येवून पैसे देणार की नाही, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. आमच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. कोणी काही वाकडे करू शकत नाही, तू पैसे दिले नाहीस तर तुला बघून घेतो, असे धमकावून दहशत माजविल्याची फिर्याद घुरखे यांनी आज करवीर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांसह अन्य अनोळखी दोघांवर असा एकूण चौघावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी दिली.