फसवणूकप्रकरणी नदाफवर आरोपपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकप्रकरणी नदाफवर आरोपपत्र दाखल
फसवणूकप्रकरणी नदाफवर आरोपपत्र दाखल

फसवणूकप्रकरणी नदाफवर आरोपपत्र दाखल

sakal_logo
By

फसवणूकप्रकरणी नदाफवर आरोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या रेश्‍मा बाबासो नदाफ हिच्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून याचा तपास होत आहे. सात दिवसांत दामदुप्पट आणि मोठ्या रकमेचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यामुळे तिला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित नदाफसह ११ जणांनी संगनमताने लोकांची सुमारे १४ कोटी ३५ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कमी कालावधीत, कमी व्याजात अधिक कर्ज मिळवून देण्याचे आमिष या टोळीने दाखविले होते. तसेच गुंतवलेली रक्कम अवघ्या सात दिवसांत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हे दाखल आहेत.
राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित ११ पैकी नदाफ आणि शब्बीर मकानदार यांना अटक केली आहे. त्यातील नदाफवर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. नदाफ इचलकरंजी येथील तणंगे मळा येथे राहते. दुसरा संशयित मकानदारवरही लवकरच आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
.....................