प्रल्पग्रस्त पालकंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रल्पग्रस्त पालकंत्री
प्रल्पग्रस्त पालकंत्री

प्रल्पग्रस्त पालकंत्री

sakal_logo
By

90024
...

प्रकल्पग्रस्तांसाठी ५ एप्रिलला बैठक

पालकमंत्र्यांची ग्वाही : सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करु

कोल्हापूर, ता. १९ : ‘प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ५ एप्रिलला बैठक घेतली जाईल. तसेच, स्थानिक पातळीवर प्रश्‍न सोडविण्यासाठी यावेळी चर्चा केली जाईल’, अशी ग्वाही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज दिली. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनानंतर पालकमंत्र्यांनी आज भेट दिली. मात्र, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी वेळ नसल्याची खंत श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारूती पाटील यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतही बैठक घेण्याचे प्रयत्न केले जातील. दरम्यान ५ एप्रिलला बैठक़ घेवून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्याशीही चर्चा केली जाईल. त्यामुळे हे आंदोलन मागे घ्यावे. मंत्रालयीन पातळीवरील या विषयावर निश्‍चितपणे तोडगा काढला जाईल.’
मारुती पाटील म्हणाले, ‘जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरील नव्वद टक्के प्रश्‍न सुटलेले नाहीत. ज्या ठिकाणी वस्ती आहे, त्याठिकाणी नागरी सुविधाही दिलेल्या नाहीत, यावर प्रशासन विचार करणार की नाही? . जिल्हाधिकाऱ्यांनी भूखंड वाटपाचे काम करावे. मात्र, हे करताना मंत्रालयाकडे बोट दाखवले जाते. अजूनही २१५ हेक्टरचा सोळा जमिनींच्या मंजुरीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. मूळ गावे, त्यांचे गट नंबर चुकले आहेत, ते जिल्हा पातळीवर पूर्ण केले पाहिजेत. यासाठी, ५ एप्रिलच्या बैठकीत चर्चा होवून यावरही तोडगा निघाला पाहिजे. जिल्हा प्रशासनाने मनात आणल्यास काही दिवसांतच हा प्रश्‍न निकालात निघणार आहे. त्यामुळे याबद्दलही निर्णय घ्यावा.’