Tue, June 6, 2023

महापालिका गुरुवारी अर्थसंकल्प
महापालिका गुरुवारी अर्थसंकल्प
Published on : 20 March 2023, 5:24 am
महापालिकेचा गुरुवारी अर्थसंकल्प
कोल्हापूर, ता. २० ः महापालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी (ता. २३) सादर केला जाणार आहे. यंदा घरफाळा आणि पाणीपट्टीत वाढ नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला जाणार होता. मात्र, आता तो गुरुवारी सादर केला जाणार आहे. प्रशासनाने महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी घरफाळा आणि पाणीपट्टी यामध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासकांसमोर ठेवला आहे. मात्र, यामध्ये वाढ केली जाणार नसल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले. नगरसेवकांच्या शिवाय सादर होणारा हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. शिक्षण, आरोग्य आणि रस्ते यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.