
निधन
02544
तुकाराम पाटील
चंदगड : धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील तुकाराम सटुप्पा पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली. उद्योजक बाळासाहेब ऊर्फ अविनाश पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.
04311
सुलोचना भोसले-पाटील
गारगोटी : सोनाळी (ता. भुदरगड) येथील सुलोचना सदाशिव भोसले-पाटील (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे. निवृत्त पोलिस उपअधीक्षक नितीन भोसले-पाटील व नंदकिशोर भोसले-पाटील यांच्या त्या आई होत.
90604
जगन्नाथ कुंभार
कोल्हापूर ः कासेगाव (ता. वाळवा) येथील जगन्नाथ विष्णू कुंभार (वय ६०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) कासेगांवला आहे. कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट्स असोसिएशनचे सचिव सुरेश ब्रह्मपुरे यांचे ते मेहुणे होत.
90610
ज्ञानू मगदूम
कोल्हापूर ः कोरेगाव (ता. वाळवा) येथील ज्ञानू सखाराम मगदूम (वय १०७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) कोरेगावला आहे.
00939
शालाबाई गुरव
असळज : कोनोलीपैकी पानारवाडी (ता. राधानगरी) येथील शालाबाई भैरू गुरव (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
90599
सुहास नाईक
कोल्हापूर : मंगळवार पेठ, गजानन महाराजनगर येथील सुहास मधुकर नाईक (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
90600
रोहिणी पटवर्धन
कोल्हापूर : गंधर्वनगरी, फुलेवाडी रिंगरोड येथील रोहिणी उदय पटवर्धन (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.
90612
अरविंद देवुलकर
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी, कोंडाओळ परिसरातील अरविंद शांताराम देवुलकर (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, भाऊ, बहीण, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
90614
अरुण पाटील
कोल्हापूर : राधाकृष्ण मंदिर, मंगळवार पेठ येथील अरुण शंकर पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, दोन मुलगे, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
00373
आबा खोत
देवाळे ः वेखंडवाडी (ता. पन्हाळा) येथील आबा म्हादू खोत (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.
90569
पार्वती दबडे
कोल्हापूर : रविवार पेठ येथील पार्वती शंकर दबडे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.
02211
सुशीला पाटील
बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील सुशीला जगन्नाथ पाटील (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.
4307
दादू नलवडे
कोनवडे : भाटिवडे (ता. भुदरगड) येथील दादू नारायण नलवडे (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
01184
पोपट पुजारी
सांगवडेवाडी : हलसवडे (ता. करवीर) येथील पोपट सदाशिव पुजारी (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, भावजय व तीन पुतणे असा परिवार आहे.
01486
शिवाजी पाटील
सोनाळी ः बाचणी (ता. करवीर) येथील शिवाजी नारायण पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
90630
श्रीमंती तोडकर
कोल्हापूर : हेरले (ता. हातकणंगले) येथील श्रीमंती अण्णासाहेब तोडकर (वय ९७) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
90509
रमेश गिणची
गडहिंग्लज : येथील रमेश साताप्पा गिणची (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.