गड-योग विद्या धाम

गड-योग विद्या धाम

योग विद्या धामतर्फे कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील योग विद्या धाम, भारतीय योग विद्या धाम नाशिक, महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रम झाला. राजू स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओजस दड्डी व डॉ. रोहिणी दड्डी दांपत्यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. ५१ सूर्यनमस्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. १०८ ओमकार जप, महामृत्युंजय जप, गायत्री मंत्र झाले. त्यानंतर डॉ. संजय चौगुले व डॉ. सौ. चौगुले यांच्या हस्ते अग्निहोत्र झाले. नववर्षात वसुंधरा बचाव आणि स्वतःचे आरोग्य जपण्याचा संकल्प केला. पुढील वर्गांचे नियोजन केले. अनिल हत्ती, सुनील हत्ती, संस्थाध्यक्ष अरविंद कित्तुरकर, कार्याध्यक्ष प्रा. शंकर खाडे, प्रा. गुरुलिंग खंदारे, बाबूराव खोत, विठ्ठल मोरे, बाळासाहेब बडदारे, दादासाहेब मांडवकर, संदीप काकडे उपस्थित होते. प्रा. सदानंद वाली यांनी आभार मानले. विश्वकल्याण प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com