गड- चेन स्नॅचिंग

गड- चेन स्नॅचिंग

Published on

हिसडा मारुन साडेतीन
तोळ्याचा दागिना पळविला

गडहिंग्लजमधील घटना : धूम स्टाईलने येत दोन तरुणांचे कृत्य

गडहिंग्लज, ता. २२ : मोटारसायकलवरुन धूम स्टाईलने आलेल्या दोघा अज्ञात तरुणांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचा सोन्याचा दागिना हिसडा मारुन घेवून पोबारा केला. मिनाक्षी जंगमनी या महिलेने पोलिसांत याबाबतची फिर्याद दिली आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, जंगमनी कुटूंबिय मुळचे सातारा जिल्ह्यातील असून सध्या ते येथील अयोध्या नगरात दुसऱ्या‍ गल्लीत राहतात. मिनाक्षी या चार दिवसांपूर्वी गडहिंग्लजमध्येच राहत असलेली मोठी मुलगी अश्‍विनीकडे गेल्या होत्या. आज सकाळी बसस्थानकापासून भडगाव रोडमार्गे मिनाक्षी व त्यांची मुलगी अश्‍विनी दोघीही चालत अयोध्या नगरमधील घराकडे जात होत्या. साडेदहाच्या सुमारास संकल्प नगरातील जाधव यांच्या घरासमोर आले असता समोरुन काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन दोन अज्ञात तरुण येत होते. त्यातील मागे बसलेल्या तरुणाने मिनाक्षी यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचा दागिन्याला हिसडा मारला. हा दागिना घेवून दोघेही मोटरसायकलने चंदगडच्या दिशेने पसार झाले. हे तरुण अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. मोटरसायकल चालवणाऱ्या‍ अज्ञाताच्या अंगात लाल रंगाचा चेक्सचा शर्ट असून त्याने काळे हेल्मेट घातले होते. मागे बसलेल्या अज्ञाताने अंगात निळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट व तोंडाला काळा मास्क लावला होता. अधिक तपास उपनिरीक्षक शितल सिसाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com