
तारदाळ :भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना अभिवादन
235
तारदाळ : जयवंत महाविद्यालयात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रा. शांताराम कांबळे. शेजारी इतर मान्यवर.
.....................
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना
जयवंत महाविद्यालयात अभिवादन
तारदाळ, ता.२३ : ‘समाजाप्रती बांधिलकी जपणे हीच देशसेवा. आपले तारुण्य देशासाठी बलिदान करणारे हे तरुण आपले आदर्श असले पाहिजेत. आज आपण जे स्वातंत्र्य भोगतो आहोत त्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांचे रक्त सांडले आहे, याची जाणीव ठेवणे हे आपले कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन जयवंत महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रा. शांताराम कांबळे यांनी केले.
यावेळी प्रवीण माळी, सत्यम देशिंगे, श्रीधर पडवळ, प्रा. योगेश माळी, प्रा. शत्रुघ्न पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष प्रा. डाॕ. वैजयंता पाटील यांनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे विचार तरुण पिढीने आत्मसात करावेत, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा. विजयकुमार साठे, प्रा. गजेंद्र माळी, प्रा. संपतराव जाधव, प्रा. सुजाता सोलगे, साईश शेलार व विद्यार्थी उपस्थित होते.
....................