
वंचित
वंचित बहुजन आघाडीचा सोमवारी मेळावा
कोल्हापूर: राज्य सरकारकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. त्यांच्या या चुकीच्या धोरणांविरोधात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा सोमवारी (ता. २७) मेळावा घेतला जाणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये दुपारी १२.३० ला हा मेळावा सुरु होईल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी दिली. मेळाव्यामध्ये वंचितच्या जिल्हा प्रभारी डॉ. क्रांती सावंत, पक्ष निरीक्षक अतुल बहुले मार्गदर्शन करतील. सकाळी ११ ला सार्वजनिक क्षेत्रात होत असलेले खासगीकरण, जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना ठोस निर्णय न देणे अशा विविध निर्णयांविरोधात बिंदू चौक येथून पदयात्रा काढली जाईल. महासचिव सिद्धार्थ कांबळे, महादेव कुमार, मिलिंद पोवार, मिलिंद सनदी, संजय गुदगे, मल्हार शिर्के, प्रवीण बनसोडे, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.