
स्वसंवादामध्ये आहे यशाचे गमक
gad241.jpg
91135
गडहिंग्लज : शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या स्नेहसंमेलनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना डॉ. कुबेर तरकसबंड. शेजारी दिग्विजय कुराडे, डॉ. राहूल जाधव.
-------------------------------------------------
स्वसंवादामध्ये आहे यशाचे गमक
डॉ. तरकसबंड : शिवराज फार्मसीमध्ये कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : सकारात्मक प्रेरणा घेवून स्वत:मधील बारकावे शोधा. तसेच संवाद कौशल्य वाढवून निरंतर शिकण्याचा प्रयत्न करा. यश हमखास मिळेल, असा मूलमंत्र मुंबईतील औषध कंपनीचे उपव्यवस्थापक डॉ. कुबेर तरकसबंड यांनी दिला.
येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या स्पंदन-२३ या वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठतेचा आढावा घेतला. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी फार्मसी विभाग इतर शाखांपेक्षा वेगळा असून विद्यार्थ्यांनी शिस्त अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिवराजचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण व ऑलींपिक खेळाडू केरोली यांची उदाहरणे देवून प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्या संकुलाचे संचालक अॅड. दिग्विजय कुराडे यांनी फार्मसी विभागाच्या वाटचालीची प्रगती सांगून भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी पंचवार्षिक योजनेद्वारे औषध निर्माणचा पाया रोवल्याचे सांगितले. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले. फार्मसी विभागाचे सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.