
शिवराजमध्ये बुधवारी राष्ट्रीय चर्चासत्र
शिवराजमध्ये बुधवारी राष्ट्रीय चर्चासत्र
गडहिंग्लज, ता. २४ : येथील शिवराज महाविद्यालयात बुधवारी (ता. २९) इंटरडीसीप्लनरी नेचर ऑफ सायन्स या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सायन्स व टेक्नोलॉजी विभागाच्यावतीने हे चर्चासत्र होईल. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसन कुराडे अध्यक्षस्थानी असतील. चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे सँटीगोच्या बायोटेक कंपनीचे सी. ई. ओ. व आय.एस.एच. ग्रुपचे संचालक डॉ. नितीन देसाई यांचे बीजभाषण होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे डॉ. बजरंग कुंभार व डॉ. गुरुदास माने तज्ञ मार्गदर्शक आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष जे. वाय. बारदेस्कर, अॅड. दिग्विजय कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी समन्वयक प्रा. किशोर अदाटे, सहसमन्वयक डॉ. ए. एम. हसुरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी केले आहे.