त्यांनी पाहिले धनगरवाडी पलिकडले जग.. ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्यांनी पाहिले धनगरवाडी पलिकडले जग.. !
त्यांनी पाहिले धनगरवाडी पलिकडले जग.. !

त्यांनी पाहिले धनगरवाडी पलिकडले जग.. !

sakal_logo
By

ajr246.JPG
91170
आवंडी (ता. आजरा) ः येथील धनगरवाड्यावर बांबू प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालेल्या महीला. या वेळी तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे व अन्य मान्यवर.

91179
महिलांनी तयार केलेल्या वस्तू.
----------------
त्यांनी पाहिले धनगरवाडी पलिकडले जग.. !
आवंडीवर बांबू प्रशिक्षण कार्यशाळा; महीलांनी बनवल्या आकर्षक वस्तू
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २४ ः .....त्यांच जग म्हणजे.... चुल, मुल, जनावरे आणि शेती. यापलिकडे त्यांच्या समोर विशेष असे काही नाही. त्यांच जगणंच कुटुंबाशी बांधलेले.... अशा महिलांसाठी आजरा पंचायत समिती, स्टार ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसीटी) कोल्हापूर अंतर्गत आवंडी धनगरवाडा क्रमांक एकवर बांबूच्या वस्तू बनवण्याचे दहा दिवसाचे प्रशिक्षण झाले. महिलांनी बांबूपासून जहाज, फुले यासह विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या. या वेळी काही महिलांनी बांबू उद्योगातून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर होण्याचा निर्धार व्यक्त केला.
आजरा तालुका हा बांबूचे आगर आहे. येथील वार्षिक उलाढाल सुमारे शंभर कोटी आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात बांबू उद्योग उभारण्यासाठी विविध संस्था प्रयत्नशील आहेत. आजरा बांबू कल्स्टर, पंचायत समिती बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या स्व. सुशीलादेवी आनंदराव आबिटकर अॅग्रीकल्चर फौंडेशन यांचेही सहकार्य मिळत आहे. त्या अनुषंगाने आवंडी धनगरवाडा क्रमांक एकवर महिला बचत गटातील महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन आबिटकर व तहसीलदार विकास अहिर यांच्या हस्ते झाले. दहा दिवसांत तज्ज्ञ आशा सांगावकर यांनी महिलांना बांबूपासून शोभेच्या वस्तू बनवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले. महीलांनी जहाज, बांबूची फुले, ट्रे यासह विविध वस्तू बनवल्या.
समारोपप्रसंगी तहसीलदार अहिर, आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सरपंच बयाजी मिसाळ प्रमुख उपस्थित होते. तहसीलदार अहिर यांनी मानवी जीवनात बांबूचे महत्व विशद केले. भविष्यातील जग हे बांबूचे असेल. पर्यावरण व अर्थशास्त्रात बांबू महत्वाची भूमिका निभावेल अशी आशा व्यक्त केली. आरटीसीचे संचालक के. के. उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले. सुनिता बाबू गावडे, सुनिता विठ्ठल गावडे, अनुसया येगडे, तेजस्वीनी गावडे यांनी भावना व्यक्त केल्या. बांबू ग्राम संस्था पेरणोलीचे सचिव सतिश कांबळे, बयाजी येडगे, धोंडीबा येडगे, तलाठी संजय निकम, उमा संकपाळ आदी उपस्थित होते. तेजस्वीनी देसाई यांनी सुत्रसंचालन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक एस. व्ही. हार्डीकर यांनी आभार मानले. चित्री अॅडव्हेंचर आवंडी संस्थेचे सहकार्य लाभले.
-----------
* कोनबॅकला देणार भेट
प्रशिक्षणामध्ये सहभागी महीलांकरीता कुडाळ येथील कोनबॅक संस्थेची सहल आयोजीत केली जाणार आहे. या संस्थेमध्ये बांबूवर केली जाणारी प्रक्रिया व तयार होणाऱ्या वस्तू याची माहीती दिली जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले.