पुईखडी पाणी गळती

पुईखडी पाणी गळती

91240
कोल्हापूर : पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातून होत असलेल्या गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे दाखवून दिले.

पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून
रोज ५० लाख लिटर पाणी वाया
कृती समिती; दहा वर्षांपासून गळती असल्याचा आरोप
कोल्हापूर, ता. २४ : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची अनागोंदी नागरी कृती समितीने आज उघड केली. पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून दररोज ४० ते ५० लाख लिटर पाणी वाया जात असल्याचे दाखवून दिले. तसेच ही गळती दहा वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार उघड होताच दोन दिवसात गळती दुरूस्तीचे नियोजन विभागाने केले आहे.
शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असताना दररोज लाखो लिटर शुध्द पाणी गळतीतून जात आहे. गेल्याच आठवड्यात कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ४० लाख लिटर पाणी वाया जात असल्याचे समितीने दाखवून दिले होते. पुईखडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातून गळतीद्वारे दररोज ४० ते ५० लाख लिटर पाणी वाहून जात असल्याचे आज कृती समितीचे ॲड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी दाखवून दिले. केंद्रातील मोठी टाकी खराब झाली असून, तेथून पाणी वाहून जात आहे. त्या पाण्याचा वापर परिसरातील व्यावसायिक करत आहेत. शेतीलाही हे पाणी दिले जात असल्याचे दिसून आले.
याबाबत कार्यकर्त्यांनी जलअभियंता हर्षजित घाटगे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर उपजलअभियंता रावसाहेब चव्हाण, मिलिंद पाटील, जयेश जाधव अधिकारी आले. अनेक वर्षांपासून ही गळती असल्याचे चव्हाण यांनी मान्य केले. तसेच ही टाकी रिकामी करून गळती काढण्याचे काम हाती घेऊ, असेही सांगितले. गळतीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नदीतून उपसा झालेल्या पाण्यापैकी ६० ते ७० टक्के पाणी गळतीतून जात आहे. नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नसताना गळती थांबवण्याचे काम प्रशासन करत नसल्याचाही आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
---------------
चौकट
दुरूस्तीचे काम तातडीने
गेल्यावर्षी पावसाळयात पाणीपुरवठा बंद करून ही गळती काढली होती. काही दिवसांपासून कमी प्रमाणात सुरु झालेल्या गळतीत वाढ झाल्याने दुरूस्तीचे नियोजन केले होते. त्या टाकीतील पाणी शेजारील थेट पाईपलाईन योजनेत बांधलेल्या टाकीमध्ये दोन दिवसात वळवून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com