Fri, June 9, 2023

भाडेकरार पाळा
भाडेकरार पाळा
Published on : 24 March 2023, 4:22 am
कूळ वापरातील मिळकतींची
तपासणी करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. २४ ः घरफाळा विभागाकडील कर्मचारी कूळ वापर असलेल्या मिळकतींकडे दुर्लक्ष करून महापालिकेचे आर्थिक नुकसान करत आहेत. त्यामुळे रिव्हिजन न करता कूळ वापरातील मिळकतींची तपासणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्याने प्रशासकांकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात भाडेकरार पद्धत रद्द केल्यानंतर कूळ वापर असलेल्या मिळकतींचा शोध घेणे व कर आकारणी अंतिम करण्याचा ठराव केला. त्याप्रमाणे कार्यवाही केली नाही तर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करायची नमूद केले आहे. २०१९ मध्ये झालेल्या या ठरावातून तपासणीचे अधिकार देऊनही कर्मचारी तपासणी करत नाहीत. ठरावीक मिळकतींना टार्गेट करून कर आकारणी केली जाते असे नमूद केले आहे.