
राजाराम कारखाना
राजाराम कारखान्यासाठी चौथ्या दिवशी ५२ अर्ज
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज चौथ्या दिवशी ५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत ६८७ अर्जांची विक्री झाली असून १०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
कारखान्याची निवडणूक लक्षवेधी ठरणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे. पहिल्या दिवसापासूनच अर्ज विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. आज ८९ अर्जांची विक्री झाली, तर ५२ जणांनी अर्ज दाखल केले. कारखान्यासाठी आतापर्यंत व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक १ मध्ये ८, दोनमध्ये १८, तीनमध्ये १४, चारमध्ये १३, पाचमध्ये ५, सहामध्ये १७, महिला राखीवसाठी १२, इतर मागास प्रतिनिधीसाठी ६, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधीसाठी ५, भटक्या जाती-विमुक्त जमातीसाठी २ आणि संस्था गटातून १ असे एकूण १०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
.................